Monday, December 23
Shadow

Maharashtra Corona Crisis: महाराष्ट्रात पूर्ण लॉकडाऊन? सर्वपक्षीय बैठकीत निर्णयाची शक्यता

Maharashtra Corona Crisis कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मागील काही दिवसांपासून कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. ज्यानंतर सर्व स्तरांतून नकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्या. राज्यातील कोरोना स्थिती पाहता शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे. 

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे ही बैठक पार पडणार आहे. जिथं दहावी – बारावी बोर्डाच्या परीक्षांसंदर्भातही निर्णय़ घेतला जाणार आहे. त्याशिवाय राज्यात सध्या लागू असणारे निर्बंध आणखी कठोर केले जाणार की त्यामध्ये शिथिलता आणली जाणार यासंदर्भात निर्णय होणार आहेत.