Wednesday, January 22
Shadow

Maharashtra Lockdown | राज्यात आज रात्रीपासून 15 दिवसांचं लॉकडाऊन लागणार, मुख्यमंत्री घोषणा करणार

राज्यात लॉकडाऊन लागू होणार हे आता निश्चित झालं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी नंतर मंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत माहिती दिली आहे. पुढील 15 दिवसांसाठी हा लॉकडाऊन असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनबाबत माहिती देतील. काही वेळात लॉकडाऊन बाबतच्या गाईडलाईन्स जारी होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनवर एकमत झालं आहे.