Monday, May 13
Shadow

Shiv Sena Crisis : शिवसेनेच्या 5 बंडखोर आमदारांना सूरतमध्ये मारहाण? गृह खात्याकडून मारहाणीची दखल

News18 Lokmat | Marathi News | Eknath Shinde | Political Crisis
Shiv Sena Crisis : शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या सूरतच्या एका हॉटेलमध्ये आहेत. हे सर्व आमदार शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातला गेले आहेत. या आमदारांमध्ये नितीन देशमुख यांचादेखील समावेश आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आमदार नितीन देशमुख यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या पाच आमदारांना सूरतमध्ये मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पाचही आमदारांना महाराष्ट्र परत यायचं होतं. त्यातूनच त्यांना मारहाण करण्यात आल्याचा दावा केला जातोय. विशेष म्हणजे या मारहाणीची गंभीर दखल गृह खात्याकडून घेण्यात आली आहे. ज्या आमदारांना मारहाण झाली आहे त्या आमदारांच्या नातेवाईकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी नितीन देशमुख यांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच आणखी दोन आमदारांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

#eknathshinde #shivsena #uddhavthackeray #eknathshindeinsurat #maharashtragovernment #News18Lokmat #marathinews #मराठीबातम्या #ibnlokmat #maharashtrapolitics

Watch latest Marathi News updates LIVE only on News18 Lokmat

News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (former IBN -Lokmat ) – a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: https://bit.ly/321zn3A
Twitter : https://twitter.com/news18lokmat?lang=en
Facebook: https://www.facebook.com/News18Lokmat

Subscribe our channel to get latest news & updates https://tinyurl.com/y4sdfw6n